Ad Code

Caste Validity : पुढील शैक्षणिक प्रवेश घेताना जात वैधता प्रमाणपत्र लागते ते काढायचे आहे हे वाचा

Caste Validity

दहावी-बारावी परीक्षेनंतर आता पुढील शैक्षणिक प्रवेशाघेण्‍यासाठी विद्यार्थी कागदपत्रांची आवश्‍यकता भासते. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यक असते.

विद्यार्थ्यांना प्रवेशाघेण्‍यासाठी अडचण येऊ नये म्हणून जात पडताळणी समितीकडून आता १५ दिवसांत जातवैधता प्रमाणपत्र दिले जात आहे.

जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन www.bartyevalidity.gov.in आणि www.ccvis.com या संकेतस्थळावरून अर्ज करावा लागणार आहे. त्यावेळी आवश्यक सर्व कागदपत्रे अचूकपणे अपलोड करायची आहेत.

अर्ज भरून पूर्ण झाल्यावर त्याची प्रिंट काढावी आणि सर्व मूळ कागदपत्रांसह विद्यार्थ्यांनी आपापल्या जिल्ह़यातील जात पडताळणी समितीच्या कार्यालयात ऑफलाईन अर्ज द्यावा. समितीच्या माध्यमातून त्या अर्जांची पडताळणी होते आणि परिपूर्ण प्रस्ताव असल्यास संबंधित विद्यार्थ्याला त्याच्या 'ई-मेल'वर ऑनलाइन पाठवले जाते. विद्यार्थ्याच्या अर्जात काही तुटी असल्यास किंवा जात वैधता प्रमाणपत्र ई-मेल वर पाठविले जाते. 

दरम्यान, विद्यार्थ्यांकडे त्यांच्या वडील, आजोबा, पणजोबाचे १९५०-६० वर्षांपूर्वीचे शैक्षणिक काहीच कागदपत्रे नसल्यास अशा प्रकरणामध्‍ये त्याच्याकडे पुराव्यासाठी रोजगार हमी योजनेचे कार्ड, खरेदी दस्तऐवज, फेरफार किंवा 'देवी'ची लस टोचल्याचे कागदपत्र तथा जन्म-मृत्यूची ग्रामपंचायतीतील नोंद, यापैकी एक कागदपत्र द्यावे लागणार आहे. पण, त्यावर जातीची नोंद आवश्यक असेल.

ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा किंवा घेतला आहे, तेथील प्राचार्याकडून '१५-अ'चा अर्ज वर सही व शिका घेणे आवश्यक आहे. आणि त्यासोबत संबंधित विद्यार्थ्यांची जात पडताळणी करून मिळावी, असा एक अर्ज देखील घेऊन प्रस्ताव सादर करावा, असे जात पडताळणी समितीने कळवले आहे.


'ही' कागदपत्रे प्रस्तावासोबत जोडा

 स्वत:चा जातीचा दाखला 

 स्वत:चा, वडिलांचा, आजोबांचा शाळा सोडल्याचे दाखले

 शैक्षणिक कागदपत्रे नसल्यास १९६० पूर्वीचा खरेदी दस्त, सातबारा, फेरफार किंवा अन्य कागदपत्रे

विद्यार्थ्याचे बोनाफाईड व प्राचार्यांकडून भरलेला (१५-अ) अर्ज व प्राचार्यांचे पत्र

 स्वत:बरोबरच वडिलांचे आधारकार्ड, रेशनकार्ड

 वंशावळ व कागदपत्रे खरी असल्यासंबंधी तहसील कार्यालयातील दोन प्रतिज्ञापत्र

* त्याच बरोबर जर रक्तामधल्या नात्यातील कोणाचे जात वैधता प्रमाणपत्र यापुर्वी काढलेले असेल तर ते देखील ऑनलाईन अर्ज करताना त्यात भरायचे आहे. तसेच ऑफलाईन देताना जात वैधता प्रमाणपत्राची प्रत सोबत जोडायची आहे. 


१९५० पूर्वीचा पुरावा बंधनकारक

जातवैधता प्रमाणपत्रासाठी 'एससी व एसटी' संवर्गातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या पूर्वजांचा १९५० पूर्वीचा पुरावा जोडणे आवश्यक आहे. तसेच 'ओबीसी व एसबीसी'संवर्गासाठी १९६७ पूर्वीचा आणि 'एनटी'साठी १९६१ पूर्वीचा पुरावा जोडणे बंधनकारक आहे. त्या कागदपत्रांवरून जात पडताळणीवेळी त्यावरून संबंधित विद्यार्थ्याची जात निश्चित होते.


परिपूर्ण प्रस्तावांवर १५ दिवसांत निर्णय

शासनाच्या निर्णयानुसार जात पडताळणीसाठी अर्ज केल्यापासून तीन महिन्यात वैधता प्रमाणपत्र दिले जाते. त्रुटी असल्यास सहा महिन्यांचा कालावधी लागतो. तरीपण, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या हेतूने परिपूर्ण प्रस्तावावर किमान १५ दिवसांत निर्णय घेतला जातो.


ऑनलाईन जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी येथे क्लिंक करा.
अधिकृत वेबसाईट



आणखी काही माहितीची पाने

Post a Comment

0 Comments