Ad Code

About

नमस्कार मित्रांनो,

मी महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्हातून आहे. माझे गाव मोहोळ आहे.

माझा एक छोटासा कॉम्पुटर टायपिंग आणि ग्राफिक्स डिझाइनचा व्यवसाय आहे. हे करत असताना मला YouTube बद्दल माहिती मिळाली. माहिती मिळाली म्हणजे मला अगोदर युट्युब वर विडिओ बघायचे माहित होते. पण आपण सुद्धा युट्युब वर विडिओ अपलोड करून इनकम करू शकतो, याबाबदल मला २०१९ माझे माहित मिळाली. मी खूप प्रयत्न करून युट्युब वर विडिओ बनवले. त्यासाठी माझा खूप वेळ गेले. 

पण त्या विडिओमध्ये मी एक चूक झाली. चूक म्हणता येणार नाही. कारण मी जे विडिओ बनवले ते होते मराठी टायपिंगचे, पण ते सगळे विडिओ मी हिंदी मध्ये बनवले होते. त्यामुळे मला वेगवेगळ्या कंमेंट आल्या. त्या कंमेंट वाचून मी विडिओ बनवणे बंद केले. 

काही दिवसांनी मला वाटले नाही आपण चूक केले तर ती आपणच सुधारलेली पाहिजे. मग मी परत तेच विडिओ म्हणजे मराठी टायपिंग शिका फक्त १० दिवसात म्हणून परत विडिओ बनवले. मात्र या वेळी मी ते विडिओ मराठी मधून बनवले. १० विडिओ बनवून झाल्यावर त्याला view खूप कमी आले. माझा खूप वेळ पण गेले. पुन्हा मी विडिओ बनवायचे बंद केले. 

६ महिन्या नंतर जेव्हा मी माझा चॅनेल बघितला त्या वेळी मला समजले कि माझे विडिओ खूप चांगले चालत आहेत. माझ्या एका विडिओ ला त्या वेळी १ लाख view आले होते. त्या नंतर लॉक डाउन मुळे मला विडिओ बनावट आले नाही. कारण माझा कॉम्पुटर शॉपमध्येच होता. 

मी लॉक डाऊन नंतर परत विडिओ बनवला सुरु केले. मला चांगला प्रतिशत मिळत गेला. त्यानंतर माझे युट्युब कडून पहिले पेमेंट पण आले. लॉक डाऊनमुळे आधीच व्यवसाय खूप डगमगला आहे. सध्याही शॉप मध्ये म्हणावे तशी कमाई होत नाही. म्हणून एक दुसरा पर्याय म्हणून मी युट्युब वर विडिओ बनवत आहे.

तुम्ही माझे विडिओ बघितले नसतील तर युट्युबवर swapnil madkar म्हणून माझा चॅनेल आहे. तुम्ही माझे विडिओ बघू शकता. 

मला बऱ्याच दिवसापासून असे वाटत होते कि आपणही एखादी वेब साइड बनवावी. त्यानंतर मला ब्लॉगर बद्दल माहिती मिळाली. मी ब्लॉगर शिकलो. मग मी हे ब्लॉगर बनवले. 

माझे शिक्षण १२ वी पर्यंत झाले आहे. पण मला कॉम्पुटर व ग्राफिक्स डिझाइनची खूप आवड आहे. गावाकडे तसे आमच्या कामाला (कलेला) जास्त किंमत नाही. शेवट एक गोष्ट समजली. लोक ऑनलाईनवर वेळ खूप घालवतात. आपण  लोकांना आपल्या युट्युब व ब्लॉगरच्या माध्यमातून शिक्षण, नोकरी विषयक माहिती, मोटिवेशनल माहिती द्यायची.

माझ्या ब्लॉगमध्ये अजून बऱ्याच गोष्टीवर काम चालू आहे. बऱ्याच चुकाही असतील/आहेत. तुम्हाला जर मला काही सुचवायचे असेल तर कॉन्टॅक्ट फॉर्म भरून सांगू शकता. 

धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र्र ..!

आपला 

स्वप्नील माडकर 

Post a Comment

0 Comments