Ad Code

आयुष्याची वजाबाकी-साथ सुटता तीची "तो" आयुष्यातुन वजा होतो....

 

Oldman

सहचारिणी असता सोबत....
तोपर्यंत "तो" राजा असतो....

साथ सुटता तीची "तो" आयुष्यातुन वजा होतो....

1) जीवनात प्रत्येक व्यक्तीची कदर करा. कारण हा जन्म पुन्हा मिळत नाही. आणि एकदा गेलेली व्यक्ती पुन्हा भेटत नाही. कधी कधी एखादा आजार हा औषधाने बरा होत नाही. तर एखाद्या व्यक्तीने दिलेल्या शाब्दिक आधाराने बरा होतो म्हणून शब्दाला धार नाही तर आधार हवा...!

2) कायम टिकणारी गोष्ट एकच ती म्हणजे माणूसकी, नम्रता आणि चारित्र्य. म्हणून पैशा पेक्षा जीवाभावाची जीवलग माणसं जोडा आणि जपा. हीच खरी आपली संपत्ती आहे...!

3) ज्याला दु:खाची जाणीव असते, त्याला सुखाची किंमतही असते, म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा. सुंदर चेहरा म्हतारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, पद सुध्दा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो. आपल्या माणसासाठी...!

4) आपल्या व्यथा तिथे मांडा जिथे समाधान मिळेल. आणि आपला माथा तिथे टेकवा जिथे स्वाभिमान मिळेल. नाही तर व्यथा आणि माथा तुडवण्यात लोकं खूप सराईत आहेत..! स्वप्ने अशी बघा की पंखांना बळ येईल. मैत्री अशी करा की जग आपले होईल. अपयश असे स्वीकारा की विजेता भारावून जाईल. माणुस असे बना की माणुसकी नतमस्तक होईल..!

5) कधीही कुणाला द्यायचाच असेल तर तूमचा वेळ द्या. कारण इतर वस्तू रागात परत केल्या जातात, पण दिलेला चांगला वेळ हा कायमच्या अप्रतीम आठवणी देवून जातो. त्या फेकल्या ही जात नाहीत आणि वाया ही जात नाहीत. पडत्या काळात दिलेली सोबत ही मोठमोठे घाव ही सहज भरुन काढते...!

6) दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं आपल्यात अजुन माणुसकी शिल्लक आहे...!

7) एक माणुस वीस-पंचवीस लोकांना दोन हाताने मारू शकत नाही.. पण तोच माणुस दोन हात जोडून लाखो लोकांच्या ह्रदयावर राज्य करु शकतो..!

8) थकलेल्या शरीराला कुठेही झोप लागते, पण थकलेल्या मनाला कुठेच झोप लागत नाही. म्हणूनच शरीर थकले तरी चालेल, परंतू मनाला कधीही थकू देऊ नका! कितीही कमावून ठेवले, तरी बाकी राहते शून्य आणि संकटाच्या वेळी कामाला येते. आपल्या कर्माने साठवलेले पुण्य..!

9) माणूस मातीचा आहे की जातीचा हे महत्त्वाचं नसून तो अंधारात प्रकाश किती देतो, हे महत्त्वाचं आहे त्याच प्रमाणे मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्त्वाचं आहे.!

10) दुसर्‍याचं भलं करायला कोणत्याही पदाची किंवा पैशाची गरज नसते. फक्त मनात चांगली भावना लागते. आयुष्यात काही 'सोडून' द्यायचं असेल तर, समोरच्याकडून 'अपेक्षा' करणं सोडून द्या. कारण अपेक्षाभंगामुळे आलेले नैराश्य फार कठीण असते...!

आपुलकीच्या व जिवाभावाच्या  माणसांसाठी समर्पित...!

शब्द मनातले...! ✍

वरील लेख आवडल्यास नक्की शेअर करा. आपल्याला काही कमेंट करुन सुचवायचे असेल तर नक्की कमेंट करुन सांगा.



Post a Comment

0 Comments