गुरुजनांना पालकांना विनंती –
खालील आवाहन इ. 1 ली ते इ. 10 वीतील विद्यार्थ्यांच्या पालकांच्या निदर्शनास आपणाव्यात. शक्य झाल्यास याच्या प्रती तयार करुन रिझल्टसोबत सर्व पालकांना वितरीत किंवा त्याची पीडीएफ फाईल डाऊनलोड करुन पालकांच्या व्हॉटॲपला पाठवावी. आणि पालकांनी ही याची प्रिंट काढून घरात आपल्या मुलांना दिसेल अशा ठिकाणी लावावी हा गृहपाठ मुलांनसाठी नसून पालकांसाठी आहे.1) रोज सकाळ-संध्याकाळचे जेवण आपल्या मुलांसोबत
करा. अन्न् वाया जावू देवू नका. त्याचे ताट त्यांना धूवू द्या.
2) भाजी निवडणे, झाडणे-लोटणे, कपडे धुणे अशी कामे
त्यांना करण्यास प्रोत्साहन द्या.
3) शेजारी रहाणाऱ्या कुटूंबाकडे जावून त्यांच्याशी
जवळीक वाढविण्याची संधी द्या. दूसऱ्यांच्या मुलांना आपल्या घरी बोलवा.
4) आजी-आजोबांसोबत गप्पा मारण्याची संधी द्या.
त्यांच्या सोबत मुलांचे फोटो काढा.
5) आपल्या कामाच्या ठिकाणी मुलांना घेवू जा. आपण
किती कष्टकरतो ? कोणते काम करतो ? हे मुलांना कळू द्या. त्याची माहिती मुलांना द्या.
6) स्थानिक यात्रा, बाजार अशा ठिकाणी मुलांना सोबत
न्या.
7) आपल्या लहानपणीच्या आठवणी, आपल्या पूर्वजांची
माहिती मुलांना सांगा.
8) मुलांच्या प्रश्नांची उत्तरे द्या. त्यांना
बोलते करा.
9) मुलांना इयत्तेनुसार 1 ते 3 तास अभ्यासासाठी
घरातील नेमून दिलेल्या ठिकाणी बसवा.
10) मुलांना खेळू द्या, पडू द्या, कपडे खराब होवू द्या.
11) मुलांना किमान एकतरी पुस्तक विकत घेवून द्या.
12) स्वत: मोबाईलचा मर्यादित वापर करा.
13) मुलाचा चेहरा दोन्ही हातात धरुन त्याच्या डोळयात
डोळे घालून बघा. ईश्वराने किती अनमोल भेट आपणास दिली आहे. याचा आनंद घ्या.
14) मुलांचे सर्व हठठ पुरविणे. म्हणजे चांगले पालकत्व,
ही खुळचट कल्पना डोक्यातुन काढून टाका.
15) आम्ही शिक्ष्क आणि तुम्ही पालक मिळून उद्याचे
सुजाण नाकरीक घडवू या.
ही पोस्ट आवडली असेल
तर कमेंट करुन सांगा. ही पोस्ट जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.
तुम्हाला ही पोस्ट
प्रिंट काढून नक्की तुमच्या घरात,ऑफीस मध्ये लावा. त्यासाठी खाली दिलेल्या बटनाला क्लिंक
करा. DOWNLOAD
OTHER POST
भविष्य निर्वाह निधी विषयी माहिती
0 Comments