Ad Code

UAN KYC Information | निर्वाह निधी विषयी माहिती

Universial Account Number

Member E-Sewa

UAN KYC

EPF म्हणजेच एम्प्लॉई प्रोविडेंट फंड हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म हा सरकारी नोकरी किंवा प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यां कर्मचऱ्यांना मिळतो. कर्मचाऱ्यांच्या पगारातील काही रक्कम कपातकरुन ती रक्कम EPF खात्यात जमा केली जाते. हा PFबॅलेंस किती आहे हे तपासण्यासाठी तुम्हाला यूनिव्हर्सल अकाऊंट नंबर(UAN)ची आवश्यकता असते. हा नंबर कर्मचारी भविष्य निधी संघटन (EPFO) यांच्याकडून प्रत्येक कर्मचाऱ्यांस दिला जातो.. UAN क्रमांक कर्मचाऱ्यांना  पहिली कंपनी सोडल्यानंतर दुसरऱ्या कंपनीत गेल्यावर त्या दुसऱ्या कंपनीस सांगावा लागतो. जेणे करुन त्या दुसऱ्या कंपनीतील कपात करण्यात आलेली रक्कम आपल्या जुन्या खात्यात जमा होईल.

जर तुमचा UAN तुम्हाला माहिती नसेल तर काळजी करण्याची गरज नाही, कारण हा नंबर तुमच्या सॅलरी स्लिपवर लिहीलेला असतो. पण समजा काही करणांमुळे तो सॅलरी स्लिपवर दिसत नसेल किंवा तुमच्या कडून तो गहाळ झाल्यास तुम्ही तुमच्या कंपनीमधून हा नंबर घेवू शकतो. त्याच बरोबर खालील पध्दतीचा अवलंब करून तुम्ही तुमचा नंबर काढू शकतो.

आपला युएएन नंबर काढण्‍यासाठी येथे क्लिंक करा.

तुम्हाला जर तुमच्या पीएफ खात्यातुन पैसे काढायचे असल्यास आपणस आपल्या खात्याचे केवायसी प्रक्रिया पुर्ण करावी लागतो. त्यासाठी

आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पास बुक इत्यादी कागदपत्रे आपणाकडे असणे गरजेचे आहे. त्याच बरोबर तुमच्या या तिन्ही डॉक्युमेंटवर तुमचे संपुर्ण नावाची स्पेलिंग एक सारखी असणे गरजेचे आहे. जर त्याबरोबर जर त्याच काही बदल असेल तर तुम्हाला ते डॉक्युमेंट बदलून घेणे गरजेचे आहे. तसे न केल्यास तुमची केवायसी प्रक्रिया पुर्ण होणार नाही. 

आणि तुम्ही तो पर्यंत केवायसी प्रक्रिया पुर्ण करत नाही. तो पर्यंत तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातुन रक्कम काढता येणार नाही. 

केवायसी साठी येथे क्लिंक करा. 


OTHER INFORMATION 

Post a Comment

0 Comments