आपल्या रेशन कार्डवर 12 अंकी एसआरसी नंबर जो की 2720******** ने सुरु होतो. हा नंबर जर तुमच्या रेशन कार्डवर नसेल तर तुमचे रेशन कार्ड ऑनलाईन नाही असे समजावे. तुमचे रेशन कार्ड लवकरात लवकर ऑनलाईन करुन घेणे ही तुमची जबाबदारी आहे. तुम्हाला जर तुमचे रेशन कार्ड ऑनलाईन करायचे असेल तर त्यासाठी रेशन कार्ड मध्ये जेवढी नावे आहेत त्या सर्वांचे आधार कार्ड झेरॉक्स आपल्या रेशन दुकानदास देवून त्या किंवा आपल्या तहसिल ऑफीस मधील रेशन कार्ड विभाग असलेल्या कार्यालयात देवून दया. व आपले रेशन कार्ड ऑनलाईन करुन घ्या. आपल्या 12 अंकी नंबर हा भविष्यात आपला डिजीटल कार्ड नंबर असणार आहे. या नंबरवर आपण देशात कुठेही रेशन घेऊ शकतो. हा नंबर आपल्या जवळ असेल तर आपल्याला रेशन कार्ड घेवून फिरण्याची गरज नाही. कारण आपले आधार कार्ड हेच आपले रेशन कार्ड असणार आहे.
दुकानदार बेईमानी करण्यासाठी कार्डवर नंबर लिहत नाहीत किंवा अर्धवट लिहतात. मग आपण एससीआर नंबर मिळवणार कसा? तर आधी आपला मोबाईलच्या प्ले स्टोर मध्ये रेशन कार्ड अँप घ्या. ते ओपन करुन दुसऱ्या पेजवर Know your intitielment या क्लिंक करा. तिसरे पेजन ओपन होईल.
जर तुमच्या एसआरसी नंबर असेल तर रेशन कार्ड नंबर चा ऑप्शन निवडा व जर नसेल तर आधार कार्डचा ऑप्शन निवडा व कुटूंब प्रमुखपैकी कोणचेही तरी एकाचे आधार नंबर टाईप करा आणि सबमिट करा. माहिती येईल त्यात तुमचा एसआरसी नंबर असेल.
आणि जर तुम्हाला रेशन कमी मिळत असेल तर
या वेबसाईटवर तक्रार दाखल करा किंवा 1800224950 यावर टोल फ्री कॉल करा किंवा mhpds.helpline@gov.in वर मेल करा.
30 दिवसात कारवाई होते. ऑनलाईन वर 21 दिवसात कारवाई झाली पाहिजे. नाही झाली तर पाठपुरावा करायला विसरु नका. गेंड़याच्या कातडीची सिस्टीम आहे. पाठपुरावा करणे आवश्यक आहे. एकदा पुर्णपणे पाठपुरावा करा काही होणार नाही असे बोलणारे व दलाल यांच्या पासून सावध रहा.
तुमच्या रेशन कार्डवर इतरांनी तर रेशन उचचले नाही ना? जाणून घ्या सर्व माहिती.
1) रेशन दुकानदाराविरुध्द तक्रार
2) रेशन कार्ड माहिती व रेशनकार्ड प्रकार
3) रेशन कार्ड नंबर ऑनलाईन कसा पाहायचा
4) शिधापत्रीका धारकांसाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सेवा.
0 Comments