सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बॅंकांकडून आता पीकांवर वाढीव कर्ज मिळणार आहे. जिल्हास्तरीय तांत्रिक समितीचे सचिव विलास देसाई यांनी त्यासंबंधीचे आदेश पारीत केले.
ऊस, द्राक्ष, डाळींब उत्पादकांसह सर्वच छोट्या-मोठ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.
राष्ट्रीयीकृत बॅंकांसह जिल्हा बॅंकेने यंदा बहुतेक पिकांच्या कर्जवाटपाची मर्यादा वाढवली आहे. डी.सी.सी. बॅंकेने तयार केलेला प्रस्ताव राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीकडे गेला होता. त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर जिल्हास्तरीय तांत्रिक समितीच्या सचिवांनी त्यासंबंधीचे आदेश काढले. १ एप्रिलपासून शेतकऱ्यांना वाढीव पीककर्ज मिळणार आहे. त्यात हापूस व केशर आंबा, मिरची, टरबूज, कलिंगड, फुलशेती, शेवगा, वांगी, ड्रॅगनफ्रूट, ज्वारी, बाजरी, भुईमूग, तूर, कापूस, मका, गहु, हरभरा, ऊस, द्राक्ष, डाळींब, चिकू, पपई, पडवळ, कारले, भाजीपाला, हळद व कांदा अशा पिकांचा समावेश आहे.
विशेष बाब म्हणजे बाजरी, भुईमूग, तूर, कापूस व मका या जिरायतील पिकांनाही बॅंकांकडून पीककर्ज मिळणार आहे.
तसेच एक गाय असलेल्यांना ३५ हजार रुपये तर म्हैस असल्यास ३७ हजार आणि शेळीमेंढी (दहा शेळ्या, एक बोकड असावे) पालन व्यवस्थापनासाठी एक लाख १० हजार रुपये, कुक्कुटपालन व्यवस्थापनासाठी २5 ते ७0 हजार रुपयांचे अर्थसहाय बॅंका करतील, असेही आदेशात नमूद आहे. पण, बॅंकांनी अडेवेडे न घेतागरज पाहून निकषांनुसार कर्जवाटप करावे.
पीकनिहाय हेक्टरी कर्ज मर्यादापीक कर्जाची मर्यादा
ऊस १,२६,०००
द्राक्ष ३,०५,८००
डाळींब १,५८,४००
ड्रॅगनफ्रूट २,२०,०००
आंबा १,५०,०००
हळद १,१५,५००
मिरची ८८०००
पपई ८४,७००
कांदा ७१,५००
शेतकऱ्यांनो, बँकेत गेल्यात जावून मागा पीककर्ज
जिल्हास्तरीय तांत्रिक समितीच्या निर्णयानुसार आता खरीप व रब्बी हंगामातील पिकांसाठी राष्ट्रीयीकृत व जिल्हा मध्यवर्ती बॅंकांकडून वाढीव पीककर्ज मिळणार आहे. बॅंकेत गेल्यावर काहीवेळा शेतकऱ्यांना कोणत्या पिकांसाठी हेक्टरी किती पीककर्ज मिळते, हे माहिती नसते.
पण, नवीन निर्णयाप्रमाणे हेक्टरी टरबूज-कलिंगडसाठी ५0 हजार, फुलशेतीला ३५ ते ५0 हजार, शेवग्यासाठी ३0 हजार रुपये, वांग्यासाठी ५0 हजार पीककर्ज मिळेल. तसेच गव्हाला हेक्टरी ३5 हजार, उसाला आडसाली असल्यास हेक्टरी एक लाख २0 हजार, पूर्वहंगामी व सुरू उसाला एक लाख २0 हजार रुपयांचे पीककर्ज दिले जाणार आहे. चिकूसाठी ७5 हजार, पडवळे-कारल्यासाठी हेक्टरी ३0 ते ३5 हजार रुपये, भाजीपाल्यासाठी हेक्टरी सहा हजार रुपयांचे कर्ज मिळेल. हे आकडे बदलू शकतात. यात थोडा बहुत फरक पडू शकतो. बँक तुमचा उतारा बघून तुम्हाला रक्कम सांगेल.
Caste Validity : पुढील शैक्षणिक प्रवेश घेताना जात वैधता प्रमाणपत्र लागते ते काढायचे आहे हे वाचा
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना लवकर महाडीबीटी पोर्टलवर येणार आहे.
शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करायची आहेपण काहीच माहिती नाही हे नक्की वाचा
आयुष्याची वजाबाकी-साथ सुटता तीची "तो" आयुष्यातुन वजा होतो....
0 Comments