Ad Code

संजय गांधी निराधार योजनेचे पैसे येण्यासाठी सर्वच्या सर्व लाभार्थ्यांनी संजय गांधी ऑफीस मध्ये नवीन अर्ज करायचा आहे.

 नमस्कार मित्रांनो,

ही माहिती आपल्या जवळच्या व्यक्ती पर्यंतच पोहोचवा ही विनंती.

वयोवृध्द, विधवा तसेच अपंग व्यक्तीना शासनातर्फे महिना 1000 रुपये मानधन येत आहे. ज्या व्यक्तीना हे मानधन येत आहे. अशा सर्वांनसाठी महत्त्वाची सुचना अशी आहे की शासनाने सर्व लाभार्थ्यांना यावेळी नव्याने प्रकरण संजय गांधी ऑफीसमध्ये जमा करण्यासाठी सांगितले आहे. 

म्हणजे या पुर्वी ज्या व्यक्तीना संजय गांधीचे महिना 1000 रुपये येत आहे असे सर्व लाभार्थी यांनी संजय गांधी ऑफीस मध्ये आपली सर्व कागदपत्रे नव्याने जमा करायची आहे.


कोणकोणती कागदपत्रे जमा करायची आहेत.

1) आधार कार्ड

2) रेशन कार्ड

3) पती मयत झालेल्याचा दाखला (जी व्यक्ती विधवा आहेत त्यांनी)

4) 65 वयाची व्यक्ती (ज्या व्यक्तीनां मुल नाही अशांनी)

5) अपंग प्रमाणपत्र

6) बँक पास बुक झेरॉक्स

7) अपंग व्यक्तीने 50000/- रुपये उत्पन्न असलेल्या मा. तहसिलदार यांचा दाखला आणि इतर व्यक्तीने 20000/- उत्पन्न असलेला मा. तहसिलदार यांचा दाखला जोडायचा आहे. 

हे सर्व कागदपत्रे घेवून नव्याने सेतु सुविधा केंद्रामध्ये अर्ज करायचा आहे. 


लवकरात लवकर अर्ज करावे अन्यथा आपल्याला जे शासनाकडून 1000 रु. जमा होत आहेत. ते बंद होणार आहे. 

Collector Office Solapur

Collector Office Solapur



आणखी काही माहितीची पाने


Post a Comment

0 Comments