Ad Code

CIBIL SCORE | सिबिल स्कोअर म्हणजे काय? सिबील स्कोर फ्रीमध्ये चेक करा.

CIBIL

जर तुम्ही क्रेडीट कार्ड वापरत असाल तर तुम्ही CIBIL बद्दल नक्कीच ऐकले असेल. याव्यतिरिक्त काही व्यक्ती बँकेमध्ये लोन मागण्यासाठी जात असतील तर त्यांनी देखील सिबिल बद्दल लेक हीच ऐकले असेल. चांगला क्रेडिट स्कोर मिळवण्यासाठी सिबिल खूप महत्त्वपूर्ण ठरतो.

तुम्हाला जर सिबील स्कोर कसा चेक करायचा व्हिडीओ बघायचा असेल तर या लिंकला क्लिंक करा.

सिबिल स्कोर हा कोणत्याही बँकेच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असतो. तसेच आर्थिक व्यवहार करणारे क्रेडिट कार्ड चा वापर करणारे प्रत्येक सामान्य व्यक्ती साठी देखील सिबिल स्कोर खूप महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला सिबिल स्कोर म्हणजे काय माहिती असणे खूप आवश्यक आहे.

सिबिल स्कोर म्हणजे काय?

सिबील स्कोर हा आपल्या पॅन कार्डवर नंबरवरुन पाहिला जातो.

आपण एखादया फायनान्स मधून एखादा मोबाईल किंवा इतर कोणतीही वस्तु घेतली असेल किंवा बँकेतुन कर्ज काढले असेल. त्यावेळी तुमच्या सिबील स्कोर वाढण्यास सुरुवात होते. 

उदा. ज्यावेळी आपण नवीन पॅन कार्ड काढतो त्यावेळी आपला सिबील स्कोर हा 0 असतो. नंतर आपण फायनान्स किंवा बँकेतुन लोन घेतो. (जे कि कमीत कमी असते किंवा जामीनदार असतो.) त्यानंतर आपण सिबील स्कोर हे आपण ज्याप्रमाणे आपल्या फायनान्स किंवा बँकेचे हप्ते भरता त्याप्रमाणे वाढत जावून तो 700 च्या पुढे जातो. 

आपण जर बँकेतुन क्रेडिट कार्ड घेतले असेल आणि त्याचा आपला व्यवहार हा सुरळीत चालू असेल तरीही आपला सिबील स्कोर वाढत जातो. 

आपण एखादे हप्ते किंवा लोन पुर्ण केल्यास आपला सिबील स्कोर हा 750 च्या पुढे जातो.

पण जर आपण बँकेचे किंवा फायनान्सचे हप्ते चुकवले तर आपला सिबील स्कोर बँक किंवा फायनान्स कंपनी कमी करते म्हणजे आपला सिबील स्कोर हा 650 च्या आतमध्ये येतो. 

अशा परिस्थीत आपणास यापुढे कोणतीही बँक किंवा फायनान्स कंपनी कर्ज देत नाही.

त्या करिता आपला सिबील स्कोर हा नेहमी 750 च्या पुढे असणे गरजेचे आहे. 


थोडक्यात सांगायचे म्हणजे, सिबिल स्कोरमुळे बँकेला कळते कि आपण जे लोन मागत आहोत ते परत करण्याची आपली योग्यता आहे कि नाही. बँक लोन देण्या अगोदर आपला सिबिल स्कोर बघते आणि मग आपल्या सिबिल स्कोरच्या आधारावर लोन द्यायचे कि नाही हे ठरवते. लोनच्या दृष्टिकोनातून सिबिल स्कोर ला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले जाते जर आपल्याला सिबिल स्कोअर चांगला असेल तरच आपल्याला लोन दिले जाते.


Online CIBIL स्कोर कसा चेक करायचा ? सिबील स्कोर फ्रीमध्ये चेक करा.

1. सर्वप्रथम तुम्हाला Free CIBIL Score चेक करायचा असे तर वेबसाईट वर जावे लागेल.


2. वेबसाईट वर आल्या नंतर तुम्हाला तिथे एक फॉर्म दिसेल तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. फॉर्ममध्ये तुम्हाला साधारण माहिती म्हणजेच नाव, पत्ता, फोन नंबर, आयडी प्रूफ या सारखी माहिती भरायची आहे. जी माहिती भराल ती योग्य भरा अन्यथा तुमचा सिबिल स्कोर दिसणार नाही.


3. त्यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नांची योग्य उत्तरे देणे अनिवार्य आहे. हे प्रश्न तुमच्या लोन विषयी किंवा क्रेडिट कार्डशी रिलेटेड असू शकतात. मग तुमचा सिबिल स्कोर मोजला जाईल आणि त्याची रिपोर्ट तयार केली जाईल.


4. तुम्ही तुमची सर्व माहिती नीट भरल्यास तुम्हाला सिबिल स्कोर व सिबिल रिपोर्ट मिळेल.


सिबिल स्कोर मिळाला म्हणजे झाले असे नाही. तुम्हाला तुमच्या सिबिल रिपोर्टमध्ये येणारे Up आणि Down पाहावे लागतात. कारण क्रेडिट एजेन्सी, बँक आणि वित्तीय संस्था प्रत्येक महिन्याला रिपोर्ट Renew करत असतात. म्हणून सिबिल स्कोर कायम चेक करणे गरजेचे आहे.


तुम्हाला जर सिबील स्कोर कसा चेक करायचा व्हिडीओ बघायचा असेल तर या लिंकला क्लिंक करा.



आणखी काही माहितीची पाने

प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY)

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2023

गुरुजनांना पालकांना विनंती 

पॅन आधार लिंक बददल माहिती

अमिताभ संपला नाही लेख

Post a Comment

0 Comments