Ad Code

MAHADBT| ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना आता महाडीबीटी पोर्टलवर

राष्‍ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत ऊसतोडणी यंत्र अनुदान योजना 2023-24 महाडीबीटी पोर्टलवर लवकरात लवकर येणार आहे. 

Mahadbt

ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीसाठी इच्छुक असणाऱ्या शेतक-यांनी, वैयक्तिक व्यावसायिकांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने ऊस तोडणीसाठी दिलेल्या प्रक्रियेनुसार अर्ज करायचा आहे. शेतकरी उत्पादक संस्थांना अनुदान उपलब्ध करुन देण्यास शासनाने 20 मार्च 2023 च्या शासन निर्णयान्वये मान्यता दिलेली आहे. 

कृषि विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. अर्जदारांना त्यांच्या पसंतीच्या ऊस तोडणी यंत्र निवडीचे स्वातंत्रय देण्यात आले आहे. या योजनेत पात्र अर्जदारांची संगणकीय सोडत पध्दतीने निवड करण्यात येणार आहे. यामुळे योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता व सुसुत्रता येऊन वरिष्ठ स्तरावरुन योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करणे शक्य होईल. 

अर्जदार अर्ज स्वत:चा मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट सामुदायिक सेवा केंद्र, सीएससी सेंटर, ग्राममपंचायत संग्राम केंद्रासारख्या माध्यमातुन संकेतस्थळावर जाऊन अर्जदार अर्ज करु शकतो. 

त्यासाठी अर्जदारास महाडीबीटी पोर्टलवर आपले स्वत:चे एक युजर नेम आणि पासवर्ड तयार करायचे आहे. त्यानंतर स्वत:ची एक प्रोफाईल बणवायची आहे. 

अर्जदारांना ऊस तोडणी यंत्राना अनुदान या घटकासाठी वैयक्तिक लाभार्थी/ शेती सहकारीसंस्था, शेतकरी उत्पादक संस्था असे नोंदणी पर्याय उपलब्ध असतील. तसेच अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावीत याबाबत सविस्तर माहिती पोर्टलवर देण्यात येणार आहे. 

वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिंक करा. 

अर्ज भरताना * असलेल्या बाबींची माहिती देणे अनिवार्य आहे. त्यासाठी शासनाने ठरवून दिलेले शुल्क आपणास ऑनलाईन द्वारे भरायचे आहे.

ही माहिती आपणास आवडली असेल आणि आपल्या व आपल्या मित्रांच्या उपयोगाची असेल तर त्यांना नक्की शेअर करा. 

त्याचबरोबर वेबसाईटवर दिलेल्या टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉईन व्हा.


आणखी काही माहितीची पाने

तुमचे रेशन कार्ड ऑनलाईन आहे का? 

प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY)

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2023

गुरुजनांना पालकांना विनंती 

पॅन आधार लिंक बददल माहिती

अमिताभ संपला नाही लेख

Post a Comment

0 Comments