भारतीय अनन्य परिचय प्राधिकरणाने आधारकार्ड धारकांसाठी काही विशेष सूचना जारी करताना आधारकार्ड खराब होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केंद्र सरकाने कार्डधारकांना केले आहे.
पूर्वी खराब कार्डही चालायचे, आता नाही :
अनेक लोक आधारकार्ड घडया घालून ठेवतात, चुरगळा करतात. त्यामुळे कार्ड खराब होते. पूर्वी खराब आधारकार्डही चालून जात होते. कारण, केवळ 12 अंकी आधार क्रमांकच आवश्यक होता. आता मात्र आधारकार्ड अस्सल आहे का, याचीही पडताळणी वापरापुर्वी केली जाणार आहे. त्यामुळे आधारकार्ड खराब होणार नाही. याची काळजी घेणे आवश्यक आहे.
कार्ड खराब झाल्यास हा त्रास होणार :
आधारकार्डच्या सत्यतेची पडताळणी करण्यासाठी त्यावरील क्यूआर कोड स्कॅन केला जातो. आधारकार्ड खराब असेल, तर क्यूआर द्वारे सत्यता पडताळणी अवघड होते. त्यामुळे महत्त्वाचे काम अडकून पडू शकते. ही स्थिती टाळण्यासाठी आधारकार्ड नीट जपून ठेवायला हवे, असे यूआयडीएआय ने म्हटले आहे.
अशी करा आधारकार्डची सूरक्षा क्लिंक करा.
आणखी काही माहितीची पाने
प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY)
0 Comments