Ad Code

विशेष सहाय्य योजनेचा लाभ सुरु ठेवण्यासाठी हयातीचा दाखला व उत्पन्न दाखला जमा करणेबाबत.

sanjay ghandi pestion


दरवर्षी संजय गांधी निराधार व दिव्यांग पेन्शनसाठी हयातीचा दाखला मागितला जात असतो. परंतु या वर्षापासून हयातीच्या दाखल्याबरोबर उत्पन्नाचा दाखला ही बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे मोठयाप्रमाणात गरीब निराधार व दिव्यांग लाभार्थ्यांची मोठयाप्रमाणात गैरसोय होत आहे. कारण सध्या सेतुची सुविध बंद आहे. बाहेर ऑनलाईन किंवा एजंटच्या मार्फत उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी लाभार्थ्यांची मोठया प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत आहे. तरी महोदयांनी याबाबत सहानुभुतीपुर्वक विचार करुन उत्पन्न दाखला अट रदद करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय मुंबई यांचे कडील शासन निर्णय क्र. विसयो-2018/प्र.क्र.62/विसयोदि. 20 ऑगसट 2019 अन्वये परिशिष्ट अनुक्रमांक लाभार्थ्यांची तपासणीम धील क च्या आधीन राहून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थी यांच्याकडून दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर एप्रिल ते जून या कालावधीत उत्पन्नाचा दाखला घेणे सक्तीचे राहीन. या कालावधीत उत्पन्नाचा दाखला सादर न केलयास लाभार्थ्यांचे जुलै पासून अर्थसहाय्य बंद करण्यात यावे. लाथार्थ्यांने त्याच वर्षाच्या 1 जुले ते 30 सप्टेंबर या कालावधीत उत्पन्नाचा दाखला सादर केल्यास प्रकरणातील अपरिहार्यता/अपवादात्मक परिस्थ्तिी विचारात घेऊन लाभार्थ्यांचे बंद केलेले अर्थसहाय्याचे वाटप पुर्ववत करण्यात यावे. अन्य  प्रकरणात लाभार्थ्यांनी उत्पन्नाचा दाखला सादर केल्यापासून लाभ सुरु करण्यात यावा अशी तरतुद आहे. 

तहसिलदार यांनी विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांचे वरील शासन निर्णय मधील तरतुदी प्रमाणे दरवर्षी लाभार्थ्यांचा हयात दाखला व तहसिलदार यांचा रु. 21000/- (दिव्यांगासाठी रु. 50000/-) उत्पन्न दाखला दि. 1 एप्रिल ते 30 जुन पर्यंत घेणे बंधनकारक आहे. तसेच लाभार्थ्यांना उत्पन्न दाखला सादर करण्यासाठी बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने निदर्शनास आल्यामुळे ले लाभार्थी हयात दखला देणेसाठी येतील परंतु त्यांच्याकडे उत्पन्न दाखला नाही अशी लाभार्थ्यांकडून उत्पन्न दाखल्याबाबत स्वयंघोषणापत्र घ्यावयाचे आहे. सदरचे स्वयंघोषणापत्र सोबत जोडले आहे. लाभार्थी हयात दाखला देताना त्यांच्याकडून स्वयंघोषणापत्र भरु घ्यावेत तसेच ते ले लाभार्थी 30 जुन पर्यंत उत्पन्न दाखला सादर करणार नाहीत. अशा लाभार्थ्यांचे अनुदान दि. 30 जुन नंतर बद करण्यात यावे. 

तसेच संदर्भीय निवेदन श्री. बाबुलाल फणीबंद, अध्यक्ष लालबावटा दिव्यांग श्रमिक संघटना यांनी आज रोजी निवेदन सादर करते वेळी मंडळ अधिकारी/तलाठी चौकशी करताना व महा-ई सेवा केंद्र चालक हे उत्पन्न दाखला काढणेकामी जास्तीच्या पैशाची मागणी करतात अशी तक्रार केली होती. जिल्ह्रयातील सेतु कार्यालय बंद झाल्यामुळे, महाईसेवा केंद्रामध्ये सदर कालावधीत उत्पन्न दाखले काढणेकरिता लाभर्थ्यांची मोठया प्रमाणात गर्दी होणार आहे. 

त्यासाठी विशेष सहाय्य योजनेचा लाभ सुरु ठेवण्यासाठी लाभार्थी यांच्याकडून उत्पन्न दाखला सादर करावयाचे 

स्वयंघोषणापत्र येथून क्लिंक करुन त्याची प्रिंट काढून तलाठी कार्यालयात जमा करावी. 


आणखी काही माहितीची पाने

शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करायची आहे पण काहीच माहिती नाही हे नक्की वाचा

आयुष्याची वजाबाकी-साथ सुटता तीची "तो" आयुष्यातुन वजा होतो....

UDID Card | अपंग व्यक्तींसाठी युनिक आयडी

लहानपणाची गोष्ट - आयला नेम चुकला | साधु आणि एक खोडकर मुलगा 

तुमचे रेशन कार्ड ऑनलाईन आहे का? 

गुरुजनांना पालकांना विनंती 

पॅन आधार लिंक बददल माहिती

अमिताभ संपला नाही लेख

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना लवकर महाडीबीटी पोर्टलवर येणार आहे.

Post a Comment

0 Comments