आपल्या शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी ओ. मुख्यमंत्री सौर कृषी योजना दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे. शेती पंपाना अखंडीत आणि भरवशचा वीज पुरवठा करण्याचे ठरविले आहे. मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा वर्ष 2025 पर्यंत 30 वाहिन्यांना सौर ऊर्जेचा पुरवठा देण्याचे ठरवले आहे. याचा लाभ राज्यातील 45 लाख कृषी वीज ग्राहकांना होणार आहे. वीज खरेदी करारानुसार वीज बिलाची रक्कम देण्यासाठी 700 कोटी रुपयांचा स्वतंत्र रिव्हॉल्विंग फंड देखील स्थापन करण्यात येणार आहे. चालू वर्षासाठी 100 कोटी रुपये इतका निधी, हरित ऊर्जा निधीमधून खर्च करण्यात येईल.
या अभियानात वीज वाहिनीसाठीची जमिन अकृषी करण्याची गरज राहणार नाही. तसेच जमिनीवरील सौर ऊर्जा प्रकल्पांत 30 वर्षांपर्यंत सर्व कर व शुल्कांतुन सुट देण्यात येईल. कृषी वीज वाहिनी योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांस नाममात्र 1 रुपया वार्षिक भाडे यापुर्वी मान्यता देण्यात आली होती. प्रति वर्षी 1 लाख 25 हजार प्रति हेक्टर याप्रकारणे भाडे देण्यात येणार आहे.
याकरिता लवकरच नोंदणी करण्यात येईल.
आणखी काही माहितीची पाने
लहानपणाची गोष्ट - आयला नेम चुकला | साधु आणि एक खोडकर मुलगा
तुमचे रेशन कार्ड ऑनलाईन आहे का?
प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY)
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना लवकर महाडीबीटी पोर्टलवर येणार आहे.
0 Comments