नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. अर्थमंऋी निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पात मांडलेल्या नवीन तरतुदी लागू झाल्या आहेत. याचा करदात्यावर काय परिणम होईल, हे जाणून घेऊ.
या बदलानुसार नवीन आणि जुनी व्यवस्था लागु केली असताना जीवन विमा पॉलिसीत जादा हप्ता भरणाऱ्यांदेखील प्राप्तिकर भरावा लागेल. शिवाय डेटस म्युच्युअल फंडवर आकारण्यात येणाऱ्या करांच्या नियमात बदल केले आहेत. जेष्ठ नागरिकांसाठीच्या बचत योजनेतील गुंतवणुकीची मर्यादा वाढविली आहे.
साडेसात लाखंपर्यंतचे उत्पन्न ऱ् प्राप्तिकराच्या नव्या कर व्यवस्थेनुसार कर सवलतीची व्याप्ती वाढविली आहे. आता सर्व कर सवलतींचा वापर केल्यानंतर उत्पन्न साडेसात लाख रुपये असेल तर ते उत्पन्न करमुक्त समजले जाईल. तीन लाखपर्यंतचे उत्पन्न संपुर्णपणे करमुक्त ठेवले आहे. तीन ते सहा लाखांपर्यंतचे उत्पन्नावर 5टक्के सहा ते नऊ लाखांपर्यंतच्या उत्पन्नांवर दहा टक्के, नऊ ते बारा रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 15 टक्के, 12 ते 15 लाख रुपयांच्या उत्पन्नापर्यंत वीस टक्के आणि पंधरा लाखोपंक्ष आधिक उत्पन्नावर 25 टक्के कर आकारणी केली जाणार आहे.
जेष्ठ नागरिकांना लाभ ऱ् गुंतवणुकीची कमाल मर्यादा पंधरा लाखांपेक्ष अधिक वाढवत 30 लाख रुपये केली आहे. याशिवाय जेष्ठ नागरिक आता मंथली इन्कम स्कीममध्ये कमाल 9 लाखांपेक्ष अधिक पैसे गुंतवू शकतील. पुर्वी ही गुंतवणूक साडेचार लाख रुपयांपर्यंत होती. पती-पत्नी हे संयुक्त रुपाने या योजनेत पैसे गुंतवत असतील, तर त्याची कामल मर्यादा पंधरा लाख रुपये होईल.
आणखी काही माहितीची पाने
प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY)
0 Comments