Ad Code

पी एम किसान योजने विषयी | या शेतकऱ्यांना पैसे परत द्यावे लागणार

farmar pm kisan


 शेतकरी निधी मिळवण्यासाठी फसवणुक करु नका. अन्यथा मोठ्या संकटात पडाल. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या १३ व्या हप्त्यानंतर शेतकरी १४ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. हप्ता मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी कागदपत्रे अपडेट करणे आवश्यक आहे.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी शेतक:यांना आर्थिक दिलासा देण्याचे काम करते. यामध्ये ४ महिन्यांनी पात्र शेतक:यांचया खात्यामध्ये रु. २००० सरकार कडून पाठविले जातात. कोणत्याही परिस्थितीत हे पैसे अपात्र व्यक्तिच्या खात्यात जाऊ नये. असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. सध्या १४ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खाात्यात येणार आहे. पण त्याबददल अधिकृत दिनांक आणखी  आलेली नाही. पण एखादी व्यक्ती शासनाची फसवणुक करुन पीएम किसान निधी घेत असेल तर त्यांनी आता सावध राहण्याची गरज आहे. शेतकऱ्याचे यादीतुन  नाव कमी होत आहे.

८ कोटीहुन अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येत आहे. प्रत्येक परिस्थितीत अपात्र शेतकऱ्यांना पैसे मिळणार यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीची पडताळणी केली जात आहे. शेतकऱ्यांचे आधार कार्ड व बँक खाते एकमेकांना लिंक आहे हा हे नक्की करुन घेणे गरजेचे आहे. आणि ते अपडेट असणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी के-वायसी केलेली नाही. अशा शेतकऱ्यांना १३ व्या हप्त्यामधून वगळले आहे.

अशा शेतकऱ्यांकडून वसुली होईल. 

चुकीची माहिती देवून व चुकीची कागदपत्रे जमा करुन या योजनेचा ज्या व्यक्तिने लाभ घेतलेला आहे. असे व्यक्ती मोठ्या प्रमाणात आहेत. अशा बनावट व्यक्तीवर केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात कार्यवाही सुरु केली आहे. अशा व्यक्तीकडून वसुलीही करत आहेत. त्याचबरोबर भविष्यात कोणत्याही शेतकऱ्याला चुकीची कागदपत्रे टाकून हप्ता घ्यायचा प्रयत्न करुन देणे असे ही केंद्र सरकारकडून सांगण्यात आलेले आहे. असे आढळल्यास त्याच्यावर कारवाही करण्यात येणार आहे. 

त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही.

केंद्र सरकारने योजनेचा लाभ देण्यासाठी पात्रता आणि अपात्रता निश्चित केली आहे. जे अपात्र असतील त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. शेतकरी जर सरकारी नोकर असल्यास, करदाता असल्यास, पेन्शन धारक असल्यास, कोणतेही लाभ पद धारणक असल्यास अशा शेतकऱ्यांस ही पेन्शन योजना मिळणार नाही. आणि या पुर्वी जर त्यांनी लाभ घेतलेला असेल त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. आणि दिलेले पैसे वसुल करण्यात येणार आहे. 

केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट देवून आपण १४ व्या हप्त्यास पात्र आहोत का हे बघू शकता. 


या ठिकाणी क्लिंक करुन आपली केवासी झालेली आहे का बघू शकतो


या ठिकाणी क्लिंक करुन आपले नाव यादीत आहे का बघू शकता.




आणखी काही माहितीची पाने

Post a Comment

0 Comments