12 वी नंतर किंवा त्यापुढील शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी आपणाकडे नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. हे काढण्यासाठी महा-ई-सेवा केंद्र किंवा सेतु सुविधा केंद्र यामध्ये आपणास जावे लागणार आहे. तसेच हा दाखला काढण्यापुर्वी आपणाकर्ड 3 वर्षाचा उत्पन्न दाखला असणे आवश्यक आहे. तसेच हा दाखला मिळण्यासाठी 45 दिवस एवढा कालावधी लागतो. त्यासाठी शाळा किंवा नोकरीच्या ठिकाणी मागणी करण्यापुर्वीच हा दाखला काढून ठेवावा. या दाखल्याची वैधता 3 वर्षापर्यंत असते.
नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्रासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
1) शाळा सोडल्याचा दाखला
2) जातीचा दाखला
3) तीन वर्षे उत्पन्न दाखला (मा. तहसिलदार साहेब यांचा )
4) आधार कार्ड
5) रेशन कार्ड
6) रहिवासी दाखला किंवा स्वयंघोषित प्रमाणपत्र
0 Comments