महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध शिष्यवृत्ती योजनांची सुरुवात करत असते. जेणेकरून राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थी या शिष्यवृत्तीच्या सहाय्याने स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने MahaDBT Portal सुरु केले आहे या पोर्टल मध्ये महाराष्ट्र राज्याच्या विविध विभागांद्वारे सुरु करण्यात आलेल्या शिष्यवृत्तीचा समाविष्ट करण्यात आला आहे.त्यामुळे विद्यार्थी महाराष्ट्र शासनाच्या MahaDBT Portal वर जाऊन सर्व विभागातील शिष्यवृत्तीची माहिती मिळवू शकतील तसेच अर्ज करून लाभ मिळवू शकतील.
महा डीबीटी स्कॉलरशिप/EBC फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
1) चालु वर्षातील उत्पन्न दाखला
2) वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र
3) जातीचा दाखला/EWS प्रमाणपत्र
4) इय. 10 वी गुणपत्रिका
5) इ. 12 वी गुणपत्रिका
6) प्रवेश पावती/बोनाफाईड
7) गॅस सर्टिफिकेट (*लागु असल्यास)
8) कॅप राऊंड लेअर (*लागु असल्यास)
9) आधार कार्ड (मोबाईल लिंक असणे आवश्यक)
10) बँक पास बुक (आधार लिंक असणे आवश्यक)
11) शाळा सोडल्याचा दाखला
12) रेशन कार्ड
13) दोन अपत्य असल्याचा दाखला (पालकाची सही)
वरील सर्व कागदपत्रे मुळ स्वरुपात/ओरिजनल असणे आवश्यक आहे.
0 Comments