Ad Code

जात वैधता/CASTE VALIDITY

 10 वी नंतर पुढील शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी जातीचा दाखला असणे आवश्यक आहे. आपणाकडे जर जातीचा दाखला नसेल तर आपणास ज्या पवर्गात मोडतो त्या पवर्गातुन किंवा शैक्षणिक किंवा नोकरीच्या त्या कोठयातुन अर्ज करु शकत नाही.

आपणास जर आपल्या जातीच्या कोठयातुन शैक्षणिक किंवा नोकरीसाठी अर्ज करावयाचा असेल तर आपणाकडे जातीचा दाखला असणे आवश्यक आहे. 

आपल्या कडे जातीचा दाखल आहे. परंतु जात वैधता प्रमाण पात्र नाही. त्यासाठी आपल्याला कोण कोणती कागद पत्रे लागतात. ती कागद पत्रे खालील प्रमाणे आहेत. 

जात वैधता काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

1) स्वत: चा शाळा सोडल्याचा दाखला

2) वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला

3) आवश्यक त्या साल पुरावा (पुराव्यासाठी वडिल, आजोबा, पणजोबा, चुलता, चुलत आजोबा, आत्या, चुलत आत्या याचा शाळा सोडल्याचा दाखला)

4) आधार कार्ड

5) रेशन कार्ड

6) रहिवासी दाखला/स्वयंघोषणपत्र

7) अर्जदाराचा जातीचा दाखला

8) वंशावळ दर्शक पुरावा

9) २ प्रतिज्ञापत्र 

10) चालू शाळेचा सही शिक्का / बोनाफाईड 

(OBC/SBC/SEBC-1967 चा पुरावा)

(SC/ST-1950 चा पुरावा)

(VJ/NT-1961 चा पुरावा)

उमेदवाराचे वय 18 पुर्ण असेल तर स्वत: उमेदवार किंवा वडिल किंवा आई अर्ज करु शकते.

Post a Comment

0 Comments